आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – वाघाडी येथील अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत विविध योगासनांचे सादरीकरण*
![]()
*आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – वाघाडी येथील अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत विविध योगासनांचे सादरीकरण*
*वाघाडी (ता. शिरपूर) | दिनांक २१ जून २०२५*
*कै. बापूसो एन. झेड. मराठे विधायक संस्था, थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांची कार्यशाळा वाघाडी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मा. डॉ. भगवानजी तलवारे साहेब यांच्या मार्गदर्शक प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.*
*कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाने करण्यात आली. त्यानंतर वृक्षासन, भुजंगासन, अधोमुख, स्थानासन, ताडासन, पवनमुक्तासन, सेतूबंधासन, बद्धकोणासन यांसारख्या विविध योगासनांचे प्रभावी सादरीकरण विशेष विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर श्वसनावर नियंत्रण ठेवणारे प्राणायाम – उच्छ्वास, श्वसन धारणा (Retention), आणि श्वासाचे नियमन यांचा सराव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ध्यानमुद्रेने करण्यात आली.*
*या उपक्रमात दोन्ही कार्यशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.*
*कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सुनील पाटील सर (कार्यशाळा व्यवस्थापक) आणि ऋषिकेश जाधव सर (निवासी कार्यशाळा व्यवस्थापक) यांनी केले. याशिवाय योग प्रशिक्षक(भौतिकउपचार तज्ञ)योगेश भावसार, तसेच (निर्देशक)राजेश पाटील, हितेश पाटील, राज बोरसे,(कलाशिक्षक)शुभम पवार, भूषण पवार,(गृहपाल) कल्पेश माळी, व शिक्षकेत्तर कर्मचारी (काळजीवाहक )हिमालय अहिरे,विकेश चौधरी, जयेश मराठे, राकेश पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन केले.*
*संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाने योगाचे शारीरिक व मानसिक लाभ आत्मसात करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, असा विश्वास संस्थापक/अध्यक्ष भगवानजी तलवारे साहेब यांनी व्यक्त केला.*

