अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या प्राचार्य पदी अनिल पाटील
1 min read

अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या प्राचार्य पदी अनिल पाटील

Loading

अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या प्राचार्य पदी अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी अनिल पाटील यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पर्यवेक्षक म्हणून 27 वर्ष सेवा केली आहे. त्यांची प्रशासनातील कार्यकुशलता व विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रमाची दखल घेत त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या आदेशान्वये अनिल पाटील यांची आर्मी स्कूल येथे प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल पाटील यांचे माजी प्राचार्य एस यु पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जेष्ठ विज्ञान शिक्षक एस ए बाविस्कर, एस एच पाटील, राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे सदस्य उमेश काटे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य श्री पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात एकमेव असलेली सैनिकी शाळा ही भविष्यात सैन्य दलात अधिकारी घडवणारी शाळा आहे. या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांना योग्य मार्गदर्शन केले तर निश्चितच शाळेसह संस्थेचा नावलौकिक वाढेल. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शिलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा श्याम पवार, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, कमांडंट लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांनी अभिनंदन केले आहे.
—-
अमळनेर- येथील आर्मी स्कूलचे नूतन प्राचार्य अनिल पाटील यांचा सत्कार करताना माजी प्राचार्य एस यु पाटील. शेजारी एस ए बाविस्कर, एच एस पाटील व उमेश काटे आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *