अमळनेरात २३ रोजी मोफत माोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर  मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांचा संयुक्तिक उपक्रम
1 min read

अमळनेरात २३ रोजी मोफत माोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांचा संयुक्तिक उपक्रम

Loading

अमळनेरात २३ रोजी मोफत माोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांचा संयुक्तिक उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी

धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सोमवार, २३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान मंगळग्रह मंदिर, चोपडा रोड येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास ना. गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी, आणि आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल (नवी मुंबई) यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने होणाऱ्या या शिबिरात सर्वांची नाव नोंदणी २३ तारखेला श्री मंगळ ग्रह मंदिर येथेच होईल. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आपल्या सोबत आधार कार्ड व रेशन कार्डाच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात, रक्त पातळ करण्यासाठीच्या किंवा मधूमेहाच्या (डायबेटीस) गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्या आणि डॉक्टरांची फाईल सोबत आणावेत, शिबीराला येतांना उपाशीपोटी येणे. (चहा व नाश्ता घेवू नये), जर आपली ऑपरेशनसाठी निवड झाली तर सोबत टिफिन आणि पांघरून सोबत ठेवणे, त्याच दिवशी पनवेल येथे जाण्याची मोफत व्यवस्था केली जाईल. हॉस्पिटलमध्ये जेवणाची सोय राहील, कुटूंबातील कोणत्याही एकाचा मोबाईल नंबर सोबत ठेवावा, डोळ्यासंदर्भातील गंभीर समस्या व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्यांनीही यावे.
तालुक्यातील जास्तीत जास्त गरजुंनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *