खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती
![]()
खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी– खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची अत्यंत आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक १ जून २०२५ पासून ते ३१ मे २०२६ पर्यंतचा कालावधी लक्षात घेता, सदर पदांसाठी त्यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी आणि सचिव प्रा. पराग पाटील यांच्या सही असलेल्या त्या नियुक्तीपत्राचे औपचारिक वितरण नुकतेच झाले. अँड. लाठी यांची निवड त्यांची कायदेशीर कौशल्ये आणि अमळनेर न्यायालयातील दीर्घकालीन अनुभव तपासल्या गेल्यानंतर करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून ते प्रादेशिक पातळीवरील विविध प्रकरणांमध्ये प्रभावी मार्गदर्शन करत असून, सामाजिक क्षेत्रातही त्यांच्या सक्रिय सहभागाची प्रशंसा केली जाते.
अँड. लाठी यांच्या या नव्या पदावर येण्यास मित्रपरिवार, सहकारी तसेच स्थानिक नागरिकांकडून अभिमान आणि हार्दिक अभिनंदन व्यक्त केले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खान्देश शिक्षण मंडळ निश्चितच अधिक सशक्त आणि न्यायसंगत कार्य करू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अँड. विवेक एच. लाठी यांचे पुढील कार्यकाळ अखंड यशस्वी जावो, ही सर्वांची सदिच्छा आहे.
खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती झाल्याबद्दल मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन!!

