छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: शिरूडमध्ये सुमारे 700 नागरिकांनी लाभ घेतला, खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: शिरूडमध्ये सुमारे 700 नागरिकांनी लाभ घेतला, खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मंत्रालया मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या अंतर्गत, शिरूड मंडळ भागातील शिरूड, इंद्रापिंप्री, कावपिंप्री, फाफोरे बु., हिंगोने ख. प्र.अ. लोंढवे, निसर्डी, वाघोदा, रणाईचे बु., अंचलवाडी, डांगर बु. कोढावळ, चोपडाई व जानवे यासह इतर गावातील नागरिकांसाठी दिनांक 19 जून 2025 या दिवशी शिबीर आयोजित करण्यात आला.
संयोजित या शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्राच्या नामांकित खासदार ताईसो. स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार स्मिताताई वाघ यांनी स्वयं उपस्थित रहात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
अमळनेर तहसिल कार्यालयाचे तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार राजेंद्र ढोले आणि तालुका स्तरावरील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपापल्या स्टॉलद्वारे सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांसाठी शासकीय योजना व सुविधा समजावून देऊन त्यांच्या तक्रारी व समस्या दूर करण्यात मदत केली.
शिबीरादरम्यान खालील सेवा व लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे, धनादेश यांचे वितरण करण्यात आले:
– नवीन शिधापत्रिका 67
– दुबार शिधापत्रिका 2
– राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश 346
– नवीन लाभार्थी अर्ज 12
– नवीन मतदार नमुना 6 भरुन घेतले 6
– स्थलांतरीत मतदार नमुना 8 भरुन 2
– उत्पन्न दाखले 127
– राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे 19
– रहिवासी प्रमाणपत्रे 19
– जाती दाखले 21
– आधार नोंदणी 27
– आधार दुरुस्ती 61
– जलतारा प्रशासकीय मान्यता (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना) 5
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रमुख तिलोत्तमा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम आहिरे, सह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
सुमारे 600 ते 700 नागरीकांनी या शिबीरात उपस्थित राहून शासनाच्या योजनांबाबत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला. तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणांनी कार्यक्रमाची यशस्वी प्रस्तावना केली तर उपशिक्षक डी.ए. धनगर यांनी उपस्थितांचे मनापासून आभार मानले.
हे शिबीर अभियान नागरिकांच्या सरकारी योजनांपर्यंत सहजतेने पोहोचण्याचा आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा महत्वपूर्ण उपक्रम सिद्ध झाला आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या शिबीऱ्यांद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



