विभागीय क्रीडा संकुल, जळगाव – एक भव्य पाऊल क्रीडा सक्षमीकरणाकडे*  ▪️ *उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम*
1 min read

विभागीय क्रीडा संकुल, जळगाव – एक भव्य पाऊल क्रीडा सक्षमीकरणाकडे* ▪️ *उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम*

Loading

 

*विभागीय क्रीडा संकुल, जळगाव – एक भव्य पाऊल क्रीडा सक्षमीकरणाकडे*

▪️ *उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम*

जळगाव दि. १८ जून (जिमाका वृत्तसेवा):
राज्य शासनाच्या युवा व क्रीडा विभागाच्या माध्यमातून जळगाव शहरात विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच मेहरूण शिवारात बांधकाम सुरू होणार आहे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिध्द करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.

*जिल्ह्याच्याच ठिकाणी दर्जेदार प्रशिक्षण:*
या क्रीडा संकुलात ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड, फुटबॉल,कुस्ती, कबड्डी, खो-खो, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, योगासने, जलतरण, शूटिंग, क्रिकेट ,टेनिस,मार्शल आर्ट आणि जिम्नॅस्टिकसारख्या विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा असणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित मार्गदर्शक, निवासी वसतिगृह, आहार, क्रीडा वैद्यक शास्त्र व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

क्रीडा मान्यतेकडे वाटचाल:
विभागीय क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला स्वतंत्र क्रीडा केंद्र म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे संकुल केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता राज्यस्तर आणि राष्ट्रीयस्तराच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास पात्र असेल.

खेलो इंडिया, मिशन लक्षवेध, युवा विकास अभियानाशी संलग्न:
या प्रकल्पाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ आणि राज्य शासनाच्या ‘मिशन युवा’ अभियानाशी संलग्न असून, खेळाडूंना स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भक्कम पायाभूत क्रीडा सुविधा पुरविण्याचा उद्देश आहे.
या प्रकल्पासाठी केंद्रिय क्रीडा व युवककल्याण मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, महापालिका प्रशासन, यांचे नियोजन सुरू असून, मेहरूण परिसरात हे भव्य क्रीडा संकुल आकार घेईल.

“खेळाडूंना संधी… जळगाव जिल्ह्याला क्रीडा मान्यता!”
या घोषवाक्याला अनुसरून शासन खेळ क्षेत्रात भरीव गुंतवणूक करत असून, या संकुलाच्या स्थापनेमुळे ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील खेळाडूंना पुढे येण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *