वडिलांचे छत्र हरपले: संघर्षातून केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण.* *नोबेल फाउंडेशनची विद्यार्थिनी मोनूचा जिद्दीचा प्रवास.*
![]()
*वडिलांचे छत्र हरपले: संघर्षातून केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण.*
*नोबेल फाउंडेशनची विद्यार्थिनी मोनूचा जिद्दीचा प्रवास.*
जळगांव प्रतिनिधी
नुकताच आपण सर्वांनी फादर्स डे साजरा केला. मात्र ज्या मुला मुलींच्या डोक्यावर वडील नावाच्या आधारवडची छाया नसते त्यांचा संघर्ष मात्र मोठा असतो.असाच संघर्ष जळगाव येथील मोनू उत्तम घुले या तरुणीने केलेला आहे.मोनू तेरा वर्षाची असताना तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. आजारपणामुळे वडील कायमचे सोडून गेलेत. मोनू ची आई देवकी आणि भाऊ योगेश यांनी वडील नसताना घराचा गाडा ओढायला सुरुवात केली. मोनूचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ए टी झांबरे विद्यालयात पूर्ण झाले. पुढे अकरावी आणि बारावी साठी तिने मुळजी जेठा महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावी मध्ये उत्तम गुण प्राप्त केले .वडिलांची मृत्यूपूर्वी एक इच्छा होती की, आपल्या मुलीने किंवा मुलाने सरकारी सेवेमध्ये दाखल व्हावे. भावावर घराची जबाबदारी असल्याने योगेश हा लहान वयातच फोटोग्राफी करू लागला व त्यातून घराचा गाडा चालू लागला. मात्र मोनूच्या मनामध्ये वडिलांचे स्वप्न कायम रुंजी घालत होते. म्हणून शाळेपासूनच क्रीडा प्रकारात सहभाग घ्यायला सुरुवात केली. एम जे महाविद्यालयात तिच्या क्रीडा आवडीला प्रोत्साहन मिळाले. मोनू उत्तम फुटबॉल खेळते फुटबॉल खेळण्याची आवड असल्याने तीने बारावीनंतर बाहेती महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण घेत असताना तिने विद्यापीठ स्तरावर तसेच राज्य पातळीवर फुटबॉल खेळासाठी योगदान दिले. याच काळात तिची भेट नोबेल फाउंडेशनच्या जयदीप पाटील सरांशी झाली. सरांचे प्रेरणादायी व्याख्यान ऐकून तिचे प्रशासकीय सेवेत जागेचे स्वप्न अजून बळकट झाले.नोबेल फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती बॅचमध्ये तिने पोलीस भरतीसाठी प्रवेश घेतला. मोनूचे पोलीस भरतीचे सर्व प्रशिक्षण नोबेल फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीमुळे पूर्ण झाले.
पोलीस भरती आणि एमपीएससीचा संयुक्तपणे अभ्यास नोबेल फाउंडेशन येथे तिने पूर्ण केला.
पुढे शिरपूर येथे आर सी पटेल महाविद्यालयात फुटबॉल ची टीम चांगली असल्याचे तिला कळले तसेच तेथील कोच देखील उत्तम असल्याचे तिला समजले म्हणून तिने एमए करण्यासाठी आर सी पटेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल साठी योगदान दिले. यात दोन वेळा तिने बक्षीसही प्राप्त केले. एमएचे शिक्षण घेत असतानाच 2024 मध्ये पोलीस भरती निघाली.धुळे येथे स्पोर्ट कोट्यातून फक्त एकच जागा होती.त्या जागेसाठी मोनू ने अर्ज दाखल केला.फिजिकल चाचणी तसेच परीक्षा उत्तमरीत्या तिने पार केली आणि एकमेव खेळाडूची जागा म्हणून पटकावली. मोनू ची पासिंग परेड पाहण्याचे आईचे स्वप्न व भावाची इच्छा पूर्ण झाली. मोनू मुळे वडिलांची अखेरची इच्छा शेवटी पूर्ण झाली.
मोनू आता जळगाव येथे पोलीस प्रशासनात दाखल झालेली आहे.मोनूचे हे यश विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
या यशाबद्दल बोलताना नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते. या इच्छाशक्तीला पाठबळ देण्याचे काम चांगले शिक्षक करीत असतात. अशा शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडते. मोनोची जिद्द आणि तिच्या आईचा व भावाचा पाठिंबा यामुळे मोनू यश प्राप्त करू शकले.
नुकताच नोबेल फाउंडेशन येथे मोनूचा सत्कार करण्यात आला यावेळी नोबेल फाउंडेशनचे मानद संचालक अमरसिंह राजपूत ,व्यवस्थापक विवेक साळुंखे तसेच नोबेलचे संचालक जयदीप पाटील उपस्थित होते.

