जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग*  ▪️ *21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु*
1 min read

जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग* ▪️ *21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु*

Loading

*जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग*

▪️ *21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु*

जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आज योगा मास्टर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध भागांतील सुमारे ४० क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षणामध्ये केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रसारित केलेल्या योगा प्रोटोकॉलनुसार शाळांमध्ये योग सत्र कसे राबवावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष योगासनांचे प्रात्यक्षिक आणि सराव सत्र घेण्यात आले.

या प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या योग क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित शिक्षकांनी योगाचे महत्त्व, त्याचे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि नियमित सरावाचे फायदे यावर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *