कावपिंप्री सहकारी संस्थेवर विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व!
1 min read

कावपिंप्री सहकारी संस्थेवर विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व!

Loading

📰 कावपिंप्री सहकारी संस्थेवर विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व!

अमळनेर प्रतिनिधी
कावपिंप्री विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, 2025–2030 या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत 12 पैकी तब्बल 11 जागांवर आपली विजयी घौडा उधळला, तर जय गजानन विकास पॅनलचे केवळ एकच उमेदवार विजयी झाले.विकास पॅनल चे पॅनल प्रमुख श्री. दिनेश रंगराव पाटील आणि श्री. अमोल जिजाबराव पाटील यांच्या 12 पैकी 11 जागा निवडून आल्याबद्दल जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ,भाजपच्या  भैरवीताई पलांडे वाघ यांनी अभिनंदन केले
ही निवडणूक अत्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पडली. मतदारांनी विकासाच्या दृष्टीने मतदान करत विकास पॅनलवर विश्वास दाखवला.

विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:

🔹 विकास पॅनलचे विजयी उमेदवार:
निंबा विठ्ठल पाटील, विनोद निळकंठ पाटील, अशोक सुकलाल पाटील, अंकुश गणपत पाटील, कैलास भाऊराव पाटील, रमेश अर्जुन पाटील, सुरेश गोकुळ पाटील, राहुल साहेबराव सोनवणे (अनुसूचित जाती-जमाती), वैशाली किरण पाटील (महिला राखीव), शोभाबाई श्रीराम पाटील (महिला राखीव), छोटू बुधा पाटील (इतर मागासवर्गीय)

🔹 जय गजानन पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार:
प्रल्हाद लटकन पाटील

या निवडणुकीत मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला. एआर कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि गावातील ग्रामस्थ मंडळांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले.

या उल्लेखनीय यशानंतर, खासदार सौ. स्मिताताई वाघ, भाजपचे तालुका व शहराध्यक्ष तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

या निकालाने पुन्हा एकदा विकासाच्या विचारांना ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *