धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी*  ▪️ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० जून रोजी होणार उद्घाटन*
1 min read

धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी* ▪️ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० जून रोजी होणार उद्घाटन*

Loading

*धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी*

▪️ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० जून रोजी होणार उद्घाटन*

जळगाव दि. १५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): धरणगाव (ता. जळगाव) येथे उभारण्यात येत असलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची पाहणी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री.गिरीश महाजन यांनी केली. हे स्मारक आदिवासींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची साक्ष देणारे असून, भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजुभाऊ चौधरी, स्थानिक पदाधिकारी, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खाज्याजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामाची उजळणी करणारे हे स्मारक सामाजिक प्रबोधनाचे कार्य करेल, असे यावेळी सांगण्यात आले. प्रकल्पासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

या स्मारकाचे उद्घाटन दिनांक २० जून २०२५ रोजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठया प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *