अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
1 min read

अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Loading

अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मा.आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची महत्वाची बैठक मा.आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी.एम. पाटील यांनी केले. ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर नाना निकम, कमल आक्का, अनंत निकम, आणि शकील काझी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणि पक्षाच्या वाढीसाठी मा.आबासाहेब पाटील यांनी विशिष्ट मार्गदर्शन केले. बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत दादा निकम यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *