स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात. अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका :: गीतांजली मुणगेकर .
![]()
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात.
अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका :: गीतांजली मुणगेकर .
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)
स्वामी विवेकानंद विद्या मंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक 13 जून 2025 रोजी स्वामी विवेकानंद दत्तनगर प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देण्यात आले शाळा परिसर फुलांचे तोरण, फुगे लावून व रांगोळी काढून सजविण्यात आला होता.
इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय एडवोकेट सौ.ललिता जोशी मॅडम उपस्थित होत्या .त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण केले ,तसेच विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत केले. पुस्तकांशी मैत्री करा व शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सन्मा मुख्याध्यापिका गीतांजली मुणगेकर यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका सौ पल्लवी चौधरी मॅडम व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


