1 min read

अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत लागू करा.-जुक्टो संघटनेची आर्त मागणी.

Loading

अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत लागू करा.-जुक्टो संघटनेची आर्त मागणी.

जळगाव प्रतिनिधी: राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावरील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसह प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांसाठी वाढीव २०%अनुदानाचा शासन आदेश दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केला. गत विधिमंडळ अधिवेशनात त्यासाठी अत्यावश्यक आर्थिक तरतूद करणे अपेक्षित होते. मात्र राज्यातील सर्व विभागातील शिक्षक आमदारांनी जोरदार मागणी करूनही शासनाने यामागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना राज्यातील समस्त अंशतः अनुदानित शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. सध्याच्या प्रचंड महागाईच्या काळात संबंधित शिक्षकांना मिळणारे वेतन अत्यंत तुटपुंजे असून त्यात संसाराचा रहाटगाडा कसा हाकावा,मुलांचे शिक्षण,आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च कसा भागवावा या विवंचनेत सदर शिक्षक आहेत.याच काळजीपोटी बहुतांशी शिक्षकांनी दुर्दैवाने आपले जीवन अकाली संपवले आहे,काही शिक्षक १००%अनुदान आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर सेवानिवृत्त देखील झाले.मात्र आजही त्या जी.आर.ची अंमलबजावणी राज्यशासन करत नसल्याने शिक्षकांमध्ये वैफल्याची भावना निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शासन दरबारी प्रयत्न करण्याबाबत जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने आज डॉ.अतुल इंगळे उपाध्यक्ष व प्रा.राजेंद्र चव्हाण सहसचिव यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी निश्चित आपली मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल असे आश्वस्त केले. सदर निवेदन देताना अशपाक पटेल, अ. जावेद अ.अजीज,सीमा केळकर,शरद गिरणारे, डॉ.दिनेश पाटील,हेमंत भोसले, फिरासत फातिमा, सादिया खान,पूर्वा मुळ्ये,उज्वला नंदुरबारे, भारत पाटील, वासंती ढाके,मनोज राठोड,गंगा निकाळजे,संजय राठोड,मनिषा बोरसे,राहुल पाटील, वर्षा लोखंडे,शिल्पा सोनवणे यांचेसह असंख्य शिक्षकांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *