डॉक्टर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत
1 min read

डॉक्टर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत

Loading

डॉक्टर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत

 

डॉ रवींद्र भोळे(पुणे विशेष प्रतिनिधी)

उरुळी कांचन, ता. 10 : पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ असून, अनेकदा ते स्वतःच्या आरोग्यापेक्षा कर्तव्यास प्राधान्य देतात. या अनुषंगाने उरुळी कांचन येथील डॉक्टर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. हा लाभ १५० हून अधिक रुग्णालयांमध्ये मिळणार असून, ही योजना लवकरच अंमलात येणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर जिल्ह्यांमध्येही अशी योजना राबवण्याची मागणी होऊ लागली आहे.

राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आणि अखेर डॉक्टर वेलफेअर असोसिएशनने ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना म्हणजे आई-वडील, पत्नी व मुले यांना वैद्यकीय उपचारांमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश आखाडे, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत शितोळे, डॉ. उमा कथले, डॉ. शरद गोते, डॉ. परिमल परदेशी, डॉ. समीर ननावरे, डॉ. विजय फडतरे, डॉ. सुनील गांगुर्डे , डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार यांनी याबाबतचे जाहीर पत्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन सुंबे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे, भाऊसाहेब महाडिक, सहदेव खंडागळे, सुनील तुपे, चंद्रकांत दुंडे, सचिन माथेफोड , दैनिक संध्या चे पत्रकार अमोल भोसले यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे म्हणाले, की पत्रकारांना त्यांच्या कुटूंबीयांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत मिळावी, यासाठी राज्य उपाध्यक्ष विजय लोखंडे तसेच केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचसोबत पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन व वाघोली डॉक्टर असोसिएशन या संघटनांशी देखील बोलणे झालेले असून थोड्याच दिवसात त्यांच्याकडे देखील ही योजना अमलात येईल. ही योजना पत्रकार बांधवांसाठी एक मोठा आधार ठरेल.
—————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *