पत्रकारांना नियोजन सभेतील प्रवेश नाकारल्याच्या मनमानी भुमिकेचा लोकस्वातंत्र्यकडून निषेध!  जिल्हा प्रशासनाला सुचना देण्याची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांना मागणी
1 min read

पत्रकारांना नियोजन सभेतील प्रवेश नाकारल्याच्या मनमानी भुमिकेचा लोकस्वातंत्र्यकडून निषेध! जिल्हा प्रशासनाला सुचना देण्याची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांना मागणी

Loading

पत्रकारांना नियोजन सभेतील प्रवेश नाकारल्याच्या मनमानी भुमिकेचा लोकस्वातंत्र्यकडून निषेध!

जिल्हा प्रशासनाला सुचना देण्याची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांना मागणी

अकोला प्रतिनिधी
—- जिल्हा नियोजन समितीच्या दि.५ जून च्या अकोला येथील सभेत जनतेपर्य़त माहिती पोहचवण्याचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारांनाच जिल्हा नियोजनच्या सभेतील प्रवेश नाकारण्यात आला.या मनमानी भुमिकेचे पत्रकारांचा अवमान करणारे आगळे वेगळे दर्शन पालकमंत्री मा.आकाशभाऊ फुंडकर व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घडविण्यात आले.या चुकीच्या पायंड्याचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे निषेध नोंदवून जिल्हा प्रशासनाला सुचना देण्याची मागणी केली आहे.

चुकीची धोरणे आणि निधीवाटप असमानता तथा विकासकामांतील अपारदर्शकता दडविण्यासाठी ही भुमिका घेण्यात आली असावी.त्यातील पक्षपात लपविण्यासाठी पत्रकारांच्या संविधानिक हक्कांचे अवमुल्यन करणारा हा उफराटा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला असावा. याबाबत पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याप्रसंगी वार्तांकनासाठी प्रवेशाच्या तयारी असणाऱ्या वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि डीजीटल मिडीया प्रतिनिधींना अवमानास्पद वागणूक देण्यात आली.प्रवेश देण्यात यावा ही मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्यावर सुध्दा त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याच्या तक्रारी पत्रकार बांधवांनी केल्या आहेत.

पत्रकार हा लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ आहे. प्रशासनाचे विकासकार्य आणि निर्णयांची माहिती घेऊन ती वार्तांकनातून जनतेसमोर सादर करणे त्यांचे कर्तव्य आहे.त्या कर्तव्यामध्ये बाधा आणून लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि संविधानिक अधिकारांची गळचेपी करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले आहे.या निंदनीय प्रकाराचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून निषेध करण्यात आला असून नियोजन समिती आणि यानंतरच्या ईतर सभांना पत्रकारांना संविधानिक अधिकारातून प्रवेश देण्यात यावा.याबाबतच्या सुचना जिल्हा प्रशासनाला द्याव्यात अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडे मेलवर पत्र पाठवून केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *