प्रवक्ता अकॅडमी तर्फे गुणवंतांचा गुणगौरव…  मान्यवरांच्या हस्ते प्रवक्ता अकॅडमीच्या पोस्टरचे लोकार्पण
1 min read

प्रवक्ता अकॅडमी तर्फे गुणवंतांचा गुणगौरव… मान्यवरांच्या हस्ते प्रवक्ता अकॅडमीच्या पोस्टरचे लोकार्पण

Loading

प्रवक्ता अकॅडमी तर्फे गुणवंतांचा गुणगौरव…

मान्यवरांच्या हस्ते प्रवक्ता अकॅडमीच्या पोस्टरचे लोकार्पण !….

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील आधीच्या शितल अकॅडमी व सध्याच्या प्रवक्ता अकॅडमी तर्फे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवक्ता अकॅडमीचे संचालक शशिकांत माळी यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र पाटील, आर डी महाजन, लक्ष्मणराव पाटील, पी डी पाटील, अरुण पाटील, सागर पाटील, योगेश सर, राजपूत सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रविंद्र पाटील, आर डी महाजन, लक्ष्मणराव पाटील, पी डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धात्मक जीवनाबद्दल मार्गदर्शन केले. जिद्द, मेहनत, चिकाटी व पुस्तक वाचन केल्याने अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकतात म्हणूनच सचोटीने अभ्यास करा व आपल्या आई – वडिलांचा तसेच शिक्षकांचा नावलौकिक वाढवा असा संदेश मान्यवरांनी दिला. गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी, इंग्रजी भाषा सहज समजावून सांगण्यात व AI तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शिकवण्यात प्रवक्ता अकॅडमी सातत्याने प्रयत्नशिल असते.
कार्यक्रम प्रसंगी धरणगाव शहरातील सर्वच शाळांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ८० % व त्यापुढील गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदश्री धनगर हिने तर आभार शशिकांत माळी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल अग्निहोत्री, हर्षाली माळी, कोमल कोतकर, स्नेहल नेरपगार, पूजा महाजन, धनश्री चौटे, कोमल पितृभक्त तसेच प्रवक्ता अकॅडमी धरणगावच्या सर्व स्टाफने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *