अमळनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त व्याख्यान आणि वृक्षारोपणाचे आयोजन
1 min read

अमळनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त व्याख्यान आणि वृक्षारोपणाचे आयोजन

Loading

अमळनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त व्याख्यान आणि वृक्षारोपणाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी – श्रमसाफल्य एजुकेशन सोसायटी संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त एक आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अभिजितभाऊ सुभाष भांडारकर (चेअरमन, श्रमसाफल्य एजुकेशन सोसायटी अमळनेर) होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून केला गेला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मा. प्राचार्य विनोद वैद्य (औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर) यांनी केली.
या वेळी पं. ज. ने समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या प्राचार्या डॉ. श्वेता विनोद वैद्य यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन या महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणहानीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती, वृक्ष तोडमुळे पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा अभ्यास आणि ते कसे टाळता येतील यावर मार्गदर्शन केले.
व्याख्यानानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले, जेथे विद्यार्थी आणि शिक्षकांनी सक्रिय सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विनोद वैद्य, श्री महेश पाठक सर, श्री शिरीष जाधव सर, अतुल लांडगे व सर्व विद्यार्थ्यांनी मोठा परिश्रम घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश पाठक यांनी समर्थपणे केले.
या उपक्रमातून युवाशक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधिक पक्के होत असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *