महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न.
1 min read

महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न.

Loading

महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न.

*ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केली होती, सदर बैठकीमध्ये कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार यांनी विविध प्रश्न मांडले, तसेच विधान परिषदेचे उपसभापती माननीय श्री अंबादास दानवे साहेब, आमदार अमरीश भाई पटेल, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज मो अभ्यंकर साहेब, आमदार जयंत अजगावकर, आमदार सुधाकर अडबले, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार कपिल पाटील यांनी खालील विविध विषयांवर मंत्री महोदय आणि अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली*
*1) 15 जून 2024 च्या संच मान्यता आदेशातील अटी शिथिल करणे बाबत पुनर्विचार केला जाईल,दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा*
*विशेष म्हणजे 0 शिक्षक झालेल्या शाळा विषयी चर्चा केली, शून्य शिक्षक संख्या झालेल्या शाळांची नववी दहावीची विद्यार्थी संख्या*
*तपासून शिक्षक दिले जातील असे ठरले, सहा ते आठ गटातील गटातील शिक्षकांचा विचार केला जाईल, संचमान्यता रिवाईज होई पर्यंत कोणत्याही* *शिक्षकाला सरप्लस केले जाणार नाही,तसेच कोणाचाही पगार थांबला जाणार नाही.*
*2) 14 ऑक्टोबर 2024 शासन आदेशानुसार निधीची उपलब्ध करून मिळावी म्हणून या पुरवणी मागणीत विषय आला पाहिजे, एमपीएससीच्या बैठकीसाठी फाईल पाठवले जाईल असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.*
*3) शेवटच्या वर्गाची पटसंख्या23-24 प्रमाणे धरून अनुदान द्यावे अशी मागणी केली, तपासून कारवाई केली जाईल असे सांगितले.*
*4) विनाअनुदानित वरून अनुदानित बदली मान्यता देण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, मंत्री महोदयांनी तसे आदेश सचिवांना दिले.*
*5) सध्या सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी ट्रेनिंग बाबतीत राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या, त्या सर्व बाबींविषयी चर्चा केली, त्या सोडवण्यासाठी संचालक राहुल रेखावार यांना मंत्री महोदयांनी आदेश दिले*,
*जे लोक काही कारणास्तव ट्रेनिंग अटेंड करू शकले*
*नाहीत, किंवा ट्रेनिंगला उपस्थित करून घेतले नाही, त्यांना दिवाळी ट्रेनिंग लावण्यात येईल, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनाही संधी दिली जाईल*
*6) इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दर्जा वाढ दिली गेली पाहिजे, त्याकरता अटी, शर्ती शिथिल केल्या पाहिजेत*
*7) समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात कमिटीचा शासन आदेश काढावा , सदरचा आदेश आज काढला जाईल*
*8) वस्ती शाळा शिक्षकांबरोबर राज्यातील 26000 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी याकरता मागणी केली, त्यावर स्वतंत्र बैठक लावून चर्चा करू असे मंत्री महोदयांनी सांगितले*
*या करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर, कोषाध्यक्ष संदेश राऊत, संपादक वामन तर्फे, घावरे सर, कुसगावकर सर, सुदर्शन त्रिगुणाताई व नितीन चौधरी सर, चौगुले सर, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *