उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे राष्ट्रीय स्तरावरील ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित..
1 min read

उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे राष्ट्रीय स्तरावरील ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित..

Loading

शैला बैसाणे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर प्रतिनिधी
नविन माध्यमिक विद्यालय अंतुली,-रंजाणे ता. अमळनेर, जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे महाराष्ट्र पत्रकार संघाचा 21 वा वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील”शिक्षणरत्न पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान सन्मानपत्र, शिल्ड आणि शाल देऊन संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे जि. कोल्हापूर  येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शैला बैसाणे हे गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांच्या कामाची दखल महाराष्ट्र पत्रकार संघाने घेतली असून, यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारामुळे त्यांना सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, माजी आमदार राजू आवळे, डी वाय पाटील चे विश्वस्त सूर्यकांत तोडकर, एलिट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नवी दिल्लीचे शंकर अदानी यां यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये, तालुकाध्यक्ष पापालाल सनदी तसेच विविध जिल्ह्यांमधून कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुंभार व प्रशांत भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर यांनी मांडले. या पुरस्काराने शैला बैसाणे यांचे प्रोत्साहन वाढले असून, त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यातून समाजसेवेत अधिक चांगले योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

चौकट

पुरस्काराने मला काम करतांना प्रेरणा मिळाली.. शालेय स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राहून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाला नेहमी प्राधान्य देत असते या राष्ट्रीय पुरस्काराने माझ्यावर कामाची मोठी जबाबदारी आली.. मी निश्चितच माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक काम करण्याचा प्रयत्न करेल.. असे अंतुर्ली- रंजाने ता.अमळनेर येयील नवीन माध्यमिक विदयालयातील  उपक्रमशील शिक्षिकाश्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांनी मराठी लाईव्ह न्युज शी बोलतांना सांगितले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *