आते मरतस कुत्रा, पुढे मरतीन लोके !  येले जिम्मेदार कोण? सांगी देस मोके-चोके  साक्री रोडचा मनमोहक खड्डा भांगेत तुळस!
1 min read

आते मरतस कुत्रा, पुढे मरतीन लोके ! येले जिम्मेदार कोण? सांगी देस मोके-चोके साक्री रोडचा मनमोहक खड्डा भांगेत तुळस!

Loading

आते मरतस कुत्रा, पुढे मरतीन लोके !

येले जिम्मेदार कोण? सांगी देस मोके-चोके

साक्री रोडचा मनमोहक खड्डा भांगेत तुळस!

धुळे शहरातील साक्रीरोडची दिवाबत्ती, दुभाजक आणि डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे लोकप्रतिनिधी, आजी-माजी घोड्यावर बसलेले भावी नगरसेवक, ‘ यह हमने किया’ म्हणत ढोल बडवतात. महापालिकेच्या निवडणूका उंबरठ्यावर असल्याने ‘पी हळद न हो गोरी’ असा प्रकार अपेक्षितच आहे. परंतु या सुंदर मनमोहक (!) रस्त्यावर कुमारनगर लगत विद्यावर्धिनी कॉम्पलेक्स समोरील दंत चिकित्सकाच्या दवाखान्यासमोरील या खड्ड्याचा ‘बाप’ कोण आहे याचा शोध कसा घेणार? या ‘खड्डे बाळाने’ अनेकांना जायबंदी केले; परंतु कुणालाही ‘सोयर-सुतक’ नाही. सुरेंद्र डेअरी, कॅनरा बँक, मोहन रेस्टॉरंट, कल्याणी डेअरी आदि ठिकाणी गतिरोधकांची गरज असतांना नको तिथे दिवे पाजळले आणि जम्बो गतीरोधक उभे केले आहेत. ( पुढारी सांगतस तठेच कंदील लाईसन हागाणी गरज काय?) शेवटी कारभाऱ्यांचे कोण मालक? ‘राजा बोले अन्‌ दल हाले’. जनता बिचारी मुकी, कुणीही हाका. शांतताप्रेमी जनतेचा अंत पहाण्यातच कारभाऱ्यांचे शौर्य दडलेले आहे. रोज साक्री रोडवर पहाटे फेरफटका मारला तर मोती नाला ते हनुमान टेकडी रोज दोन-चार कुत्रे मेलेले दिसतील. या कुत्र्यांचा मृत्यु नैसर्गिक नव्हे तर वाहनांच्या धडकीने होतो. आज कुत्री मांजरी मरत आहेत, उद्या माणसे मेली तरी आश्र्चर्य वाटायला नको. धर्मेंद्रच्याही चिकण्या-चोपड्या गालाला मान खाली घालायला लावेल असा हा मनमोहक रस्त्यावरील ‘खवड्याला’ तुळसेत भांग म्हणावी की भांगेत तुळस?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *