लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मागणीला यश*  *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ८०० सें.मी. जाहीरातीची लघु वृत्तपत्राला भेट!!*  *साहेबांवर महाराष्ट्र भरातून अभिनंदनाचा वर्षाव!!!*
1 min read

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मागणीला यश* *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ८०० सें.मी. जाहीरातीची लघु वृत्तपत्राला भेट!!* *साहेबांवर महाराष्ट्र भरातून अभिनंदनाचा वर्षाव!!!*

Loading

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मागणीला यश*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ८०० सें.मी. जाहीरातीची लघु वृत्तपत्राला भेट!!*

*साहेबांवर महाराष्ट्र भरातून अभिनंदनाचा वर्षाव!!!*

वसूंधरा दिनाची ८०० सें.मी. जाहिरात फक्त बिड जिल्ह्याला ! बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणार्‍या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना सवाल केला होता! अशा आशयाची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे लढाऊ वृत्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख साहेबांनी मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून जाब विचारला व पत्रामध्ये असेही म्हटले होते की, पंकजा मुंडे ह्या फक्त बिड जिल्ह्याच्या मंत्री आहेत की महाराष्ट्राच्या! या आशयाचे पत्र पाठवून महाराष्ट्रातील इतर लघु वृत्तपत्रावर अन्याय केला आहे. इतर वृत्तपत्रांनाही ८०० सें.मी.ची जाहीरात द्या अशी मागणी केली असता. त्या पत्राचे उत्तर देखिल आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाला देण्यात आले. त्याचेच फलित म्हणून की काय, महाराष्ट्रातील सर्व लघु वृत्तपत्रांना यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती प्रित्यर्थ दरवर्षी ४०० से.मी. जाहीरात देत असतांना यावर्षी मात्र ८०० से.मी.ची जाहिरात देऊन आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे.

वेळोवेळी पत्रकारांच्या मागणीसाठी अहोरात्र झटणारे आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय /संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजय देशमुख यांनी ज्या ज्या वेळी पत्रकारांसाठी आवाज उठवला त्या-त्या वेळी त्यांचे मागणीला यश प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्रभर इतर कोणीही पत्रकारांसाठी लढतांना दिसत नाही म्हणून महाराष्ट्रभरातील लघुवृत्तपत्र व इतर वृत्तपत्रांचे प्रतिनिधींनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय देशमुख साहेबांचे अभिनंदनाचा त्यांवर वर्षाव करणे सर्वांचे कर्तव्य ठरते.
काही वृत्तपत्रे अशाच आंदोलनातून उदयास आलेली आहेत, परंतू पत्रकार महासंघाच्या बातम्या प्रकाशित करण्यासाठी देखिल त्यांना अशा संघटनेकडून जाहीरातीची अपेक्षा करतात.

त्यांनी हे समजून घ्यावे की, त्यांचे आंदोलनामुळे तुम्हालाही ही ८०० सें.मी. जाहिरात मिळाली आहे त्यामुळे त्या संघटनांच्या बातम्या अशा वृत्तपत्रांनी अडवू नये हा कोत्या मनाचा विचार असून कृतघ्नपणा ठरतो.
साहेब, तुम्ही रोखठोकपणे मुख्यमंत्र्याला सवाल केला व महाराष्ट्रातील लघुवृत्तपत्रांना त्यांचे बक्षीस म्हणून ८०० से.मी.जाहीरात मिळाली. संपुर्ण महाराष्ट्रात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा जयजयकार होतो आहे. महाराष्ट्रभर संघटनेचे जाळे विनल्या जात असून महाराष्ट्राच्या बाहेर लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाने तीन/चार राज्यामध्ये पदार्पण केलेले आहे. साहेब तुमच्या नेतृत्वांवर सर्वांचा विश्वास आहे. घरादारांची तमा न करता फक्त पत्रकारांच्या हितासाठी झटणार्‍या पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षांना त्यांच्या क्रांतीकारी कार्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो. प्रत्येक कामासाठी साहेब सदैव पाठीशी असतात, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करीत असल्याचा आम्हाला अत्यानंद होतोा आहे.

साहेबांच्या कार्याबद्दल असे म्हणता येईल की,

*जो सफ़र की शुरुआत करते हैं,*
*वो मंजिल भी पा लेते हैं,*
*बस एक बार चलने का*
*हौसला रखना बहुत जरूरी है।*
*क्योंकि अच्छे इंसानों का तो,*
*रास्ते भी इंतजार करते हैं*

*पंजाबराव वर*
*अध्यक्ष : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ*
*अकोला जिल्हा, मो.नं.* *९९२२९२४६८४*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *