त्रिशताब्दी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त अमळनेर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर, सर्व जाती धर्मातील मान्यवरांचा ऐक्य: मुस्लिम, आदिवासी, बौद्ध, जैन आणि हिंदूंनी मानवतेसाठी रक्तदान महामातेचा आदर्श जपत मानवतेची सेवा करण्याचा संकल्प: महिलांनीही दिला रक्तदानाचा अमूल्य हातभार
![]()
त्रिशताब्दी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त अमळनेर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर
सर्व जाती धर्मातील मान्यवरांचा ऐक्य: मुस्लिम, आदिवासी, बौद्ध, जैन आणि हिंदूंनी मानवतेसाठी रक्तदान
महामातेचा आदर्श जपत मानवतेची सेवा करण्याचा संकल्प: महिलांनीही दिला रक्तदानाचा अमूल्य हातभार
१०३ रक्तपिशव्या संकलित; जीवन श्री व जीवन ज्योती ब्लड सेंटरच्या टीमची यशस्वी सहयोगी भूमिका
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
रणमर्दानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्व जाती धर्मातील लोकांचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अमळनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्यात मुस्लिम, आदिवासी, बौद्ध, जैन, हिंदू मान्यवरांनी रक्तदान केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी लोकोपयोगी कार्य केले आहे. त्यांच्या लोकोत्तर कार्याचे, न्यायनिष्ठ राज्यकारभाराचे आणि सार्वजनिक हितासाठी दिलेल्या योगदानातून उतराई होण्यासाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना कृतीतून अभिवादन करण्याचा अल्पसा प्रयत्न रक्तदान शिबिरात केला. संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक त्यांच्या कार्याची ओळख होत असते. महामातेचा आदर्श जपतांना, मानवतेची सेवा करूया! या स्लोगन खाली अमळनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने डी. ए. धनगर व देवाभाऊ लांडगे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. त्यांना जीवन श्री ब्लड सेंटर अमळनेर व जीवन ज्योती ब्लड सेंटर धुळे यांच्यामार्फत योगेश महाले व वेदांत कुलकर्णी यांच्या टीमने सहकार्य केले. यावेळी 103 रक्त पिशव्यांचे संकलन केले.
सदर शिबिराला आमदार अनिल पाटील, भैरवीताई पलांडे, जयश्रीताई अनिल पाटील,डॉ अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व अन्य मान्यवरांनी भेट दिली. सदर रक्तदान शिबिरात महिला रक्तदाते म्हणून वंदना सोनवणे यांनी पण रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मल्यार्पण करून झाले
यावेळी भारती पाटील, भारती सोनवणे, वसुंधराताई दशरथ लांडगे, सोनल धनगर, नाना कंखरे, बापू धनगर, श्याम पाटील, हरचंद लांडगे, जिजाबराव पाटील, बन्सीलाल भागवत, मच्छिंद्र लांडगे,दशरथ लांडगे, अनिल बागुल, गोपाल हडपे, शशिकांत आढावे, प्रदीप कंखरे, नितीन निळे, रमेशदेव शिरसाठ,आलेश धनगर, चेतन देवरे, सौरव भागवत, भावलाल धनगर ,श्रीमती.वंदना बळवंतराव सोनवणे (उपशिक्षिका) जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर इ होय..विशेष म्हणजे पुरूषांच्या बरोबर महीलांनीपण रक्तदान केले.
प्रत्येक रक्तदान करणाऱ्याला भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले.






