महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान
1 min read

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान

Loading

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान

 

पुणे ( फुगेवाडी): महासम्राज्ञी येसूबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने देण्यात येणारा समाज रत्न पुरस्कार 2025 नुकताच उरुळी कांचन येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. पुष्पगुच्छ शाल ,स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र व महासम्राज्ञी येसूबाई यांच्या जीवनावरील चरित्रात्मक पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते. राजे शिर्के घराण्यातील शिवाजीराव शिर्के संस्थापक अध्यक्ष महासम्राज्ञी येसूबाई प्रतिष्ठान यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महासम्राज्ञी येसूबाई या शिर्के घराण्यातील असून त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांच्या कुलवधू होत्या. त्यांनी मोगलांच्या छावणी तब्बल 30 वर्षे बंदीवासात घालवले होते. बंदीवासामध्ये असून सुद्धा त्यांनी हिंदू मराठा धर्मातील झालेल्या संस्काराला तीळ मात्र धक्का लागू न देता कैदेत आपली अस्मिता जपत मुलाला वाढविले व छत्रपती शाहू महाराज यांच्यावर संस्कार केले . महासम्राज्ञी येसूबाई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा हा समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक, हिंदू रत्न डॉ.रवींद्र भोळे यांचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. डॉ. रवींद्र भोळे यांनी सामाजिक, धार्मिक ,अध्यात्मिक, वैद्यकीय ,वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, नैसर्गिक आपत्ती कार्य मराठवाडा भूकंप, एड्स निर्मूलन, टीबी कॅन्सर ,लेप्रसी , जनजागृती , आरोग्य शिबिरे ,मोफत हृदयरोग चिकित्सा शिबिरे ,आय कॅम्प , युरिनरी कॅम्प,तसेच डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने धर्मदाय लाखो लोकांना वैद्यकीय सेवा दिलेली आहे. त्यांच्या जीवनावर वाळवंटातील समाजसेवी सरोवर हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. डॉक्टर रवींद्र भोळे यांनी 35हून अधिक वर्ष राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. ते उत्कृष्ट प्रवचनकार असून समाज प्रबोधन व व्यसनमुक्तीचे कार्य करीत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *