छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत हेडावे मंडळ भागातील ग्रामस्थांसाठी शिबीराचा यशस्वी आयोजन
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत हेडावे मंडळ भागातील ग्रामस्थांसाठी शिबीराचा यशस्वी आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक २५ मार्च २०२५ च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने हेडावे मंडळातील अनेक गावांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने दि. ३० मे २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सडावण बु. (ता. अमळनेर) येथे व्यापक शिबीर पार पडले.
शिबीराचे उद्घाटन मान. आमदार दादासो. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शिबीराच्या यशस्वितेबाबत कौतुक व्यक्त केले तसेच सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी लक्षात घेतल्या.
शिबीराला उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी श्री. नरेंद्र पाटील, उप अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती स्मिता गावित तसेच तालुका स्तरावरील सर्व शाखा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून सादर गावातील शेतकरी, महिला, विद्यर्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या शासकीय तक्रारींचे निराकरण केले व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, धनादेश यांच्या वाटपाचे काम केले.
शिबीरात विविध कार्यालयांकडून लाभार्थ्यांना देण्यात आलेले लाभ:
पुरवठा शाखा, तहसिल कार्यालय अमळनेर १०३ नवीन व दुबार शिधापत्रिका; राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश वाटप ,संगायो शाखा, तहसिल कार्यालय अमळनेर २१७ डीबीटी प्रक्रिया पूर्ण निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय अमळनेर ,१९ नवीन लाभार्थी अर्ज; ११ नवीन मतदार नोंदणी (नमुना ६); ७ स्थलांतरीत मतदार नमुना ८ सेतु शाखा, तहसिल कार्यालय अमळनेर,३३१ उत्पन्न दाखले; ५७ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र; ५३ रहिवासी प्रमाणपत्र; १७ जातीचे दाखले
आधार नोंदणी व दुरुस्ती ,११३ आधार नोंदणी; २६७ आधार दुरुस्ती,राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना ,१८ पात्र लाभार्थ्यांना शिधा वाटप,उप अधिक्षक भूमि अभिलेख, अमळनेर, ८१ सनद वाटप पंचायत समिती अमळनेर १७ जलतारा प्रशासकीय मान्यता ,तुकडा नोंद कमी करून दुरुस्त,१७ तुकडा नोंद सुधारित ७/१२ उतारा वाटप ,मंडळ अधिकारी हेडावे/तलाठी ,२१ आदेशानुसार नवीन नोंदी घेऊन सुधारित ७/१२ उताऱ्यांचे वाटप
शिबीरात अंदाजे ७०० ते ८०० नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराण यांनी उपस्थितांचे आभार मानले व पुढील काळात अशाच प्रकारच्या शिबीरांच्या आयोजनाचे आश्वासन दिले.
हे शिबीर प्रशासन व ग्रामस्थांमध्ये संवाद व सुविधा उपलब्ध करून देण्यास एक महत्त्वाचा टप्पा ठरले असून, गावागावात सरकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात मदत झाली आहे.
हे शिबीर पुढील काळातही महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान” अभियानाच्या माध्यमातून सातत्याने आयोजित करण्यात येणार आहे.

