एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये -शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार
1 min read

एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये -शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार

Loading

एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये -शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार

जळगांव प्रतिनिधी

-जळगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी नशिराबाद बीट मधील विद्यार्थी प्रवेश नोंदणीचा आढावा घेतला. नशिराबाद गावातील वाडी वस्तीला भेट देऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये शाळा प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची खात्री करावी अशा सूचना शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी दिल्या.जिल्हा परिषद कन्या नंबर दोन शाळेचे मुख्याध्यापक जगदीश चौधरी, शिक्षिका सोनाली साळुंखे, नीता कापडणे, मनीषा भंगाळे, केंद्र शाळेचे शिक्षक तुषार सोनवणे यांनी सदर पट नोंदणी मोहिमेत सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे, असे विजय पवार यांनी सांगितले. नशिराबाद व शिरसोली बीट मधील सर्व जिल्हा परिषद मुख्याध्यापक व शिक्षकांना पट नोंदणी करण्याचे व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत वाढ करण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *