मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत मसाला ताकचे वाटप  जैन जागृती सेंटरचा स्तुत्य उपक्रम
1 min read

मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत मसाला ताकचे वाटप जैन जागृती सेंटरचा स्तुत्य उपक्रम

Loading

मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत मसाला ताकचे वाटप

जैन जागृती सेंटरचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात जैन जागृती सेंटर, सेंटर बोर्ड मुंबई आणि जैन जागृती सेंटर, अमळनेरतर्फे मंगळवारी मोफत मसाला ताकचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उकाळ्याने त्रस्त भाविकांना काहीसा दिलासा मिळाला.
सध्या उन व पावसाच्या छिळकाव्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. मंगळवारी श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची झालेली गर्दी पाहता जैन जागृती सेंटर, सेंटर बोर्ड मुंबई आणि जैन जागृती सेंटर, अमळनेरतर्फे भाविकांना मसाला ताकचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रवासात दमलेल्या व घामाघुम झालेल्या भाविकांना काहीसा दिलासा मिळाला.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, ए. टी. पाटील, बाळा पवार, जैन जागृती सेंटर, अमळनेरचे अध्यक्ष तथा विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष डॉ. संजय शाह, सचिव विक्रम शाह, खजिनदार मनिष शाह, यश हळवदिया, पंकज दोडिवाला, मुकेश शाह, विपूल शाह, हितेश खन्ना, केहुल कोठारी, चेतन शाह आदी उपस्थित होते.
जैन जागृती सेंटरचा हा स्तुत्य उपक्रम गेल्या महिन्याभरापासून सुरू असून शहरातील गर्दीच्या ठिकाणी मसाला ताकचे मोफत वाटप केले जात आहे. संस्थेचे १ लाख रुपये किमतीचे मसाला ताक वाटप करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष डॉ. संजय शाह यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *