महेंद्र ताजणे यांची कविता मराठी कवितेला संजीवकता प्रदान करणारी-बाबाराव मुसळे
![]()
महेंद्र ताजणे यांची कविता मराठी कवितेला संजीवकता प्रदान करणारी-बाबाराव मुसळे
जळगाव:- स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावच्या वतीने स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य आणि कादंबरी राज्य पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.यावर्षीचा काव्य पुरस्कार पंचाळा ,वाशिम येथील कवी महेंद्र ताजणे यांच्या “खूप काही आणखी” या काॅपर काॅईन नवी दिल्ली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहास आणि गुहाघर, रत्नागिरी येथील प्रा.बाळासाहेब लबडे यांच्या
“चिंबोरेयुद्ध” या अथर्व पब्लिकेशन्स जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या कादंबरीस घोषित करण्यात आलेले होते. या पुरस्काराचे वितरण हे कवी/कादंबरीकार यांचे घरी जाऊन पुरस्कार आपले दारी या अभिनव उपक्रमाने करण्यात येते. यावर्षी कवितेचा पुरस्कार कवी महेंद्र ताजणे यांच्या घरी दिनांक २७ में २०२५रोजी पंचाळा या गावी कवीच्या घरासमोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदीर येथे ज्येष्ठ कादंबरीकार मा.बाबाराव मुसळे यांचे हस्ते आणि भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य मा.गोवर्धन चोथमल यांचे अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संयोजक शशिकांत हिंगोणेकर यांनी पुरस्कारासंदर्भाची पार्श्वभूमी सांगून निवडप्रक्रिया विषद केली.आणि महेंद्र ताजणे यांची कविता ही मराठी कवितेला बुद्ध,फुले आंबेडकरांच्या विचारांनी समृद्ध करणारीआहे.हे अधोरेखित केले.या पुरस्काराचे निमित्ताने कवी महेंद्र ताजणे यांनी हा निरपेक्ष पुरस्कार निवडीचा आनंद व्यक्त करून हा पुरस्कार माझे जीवनाला आणि कवितेला बळ देणारा आहे.तथागत गौतम बुद्ध आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी जी जीवन संघर्षाची मूल्ये मला दिली आहेत त्यांना उजागर करणारा हा पुरस्कार असल्याचे मनोगतात उच्चार केला. याप्रसंगी कवी शेषराव धांडे यांनीही हा पुरस्कार समता आणि मानवता प्रस्थापित करणाऱ्या विचारधारेला दिलेला असल्याचे प्रतिपादन केले. कवी अनिल कांबळे यांनी तर हा पुरस्कार स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करणाऱ्या विचारांच्या अभिव्यक्तीला मिळालाय. हे नम्रपणे नमुद केलेय. बाबाराव मुसळे यांनी या पुरस्काराने कवी महेंद्र ताजणे यांचेवर अधिकच जबाबदारी आलीय. महेंद्र ताजने निश्चितच मराठी कवितेला संजीवकता प्रदान करणारी कविता दीर्घकाळ लिहीतील असा विश्वास व्यक्त केला. समोरपीय अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गोवर्धन चोथमल यांनी दलित पँथरच्या चळवळीने नामदेव ढसाळांच्या रूपात आंबेडकरी साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलीय. महेंद्र ताजणे यांची ही कविता ही मानवी मूल्यांची असून ती समस्त शोषित पीडीत समाजाच्या वेदनेला अर्थ प्रदान करणारी निश्चितच आहे.असा ठाम विश्वास व्यक्त केला. या कौटुंबिक सोहळ्यात वाशिमचे समाजसेवक अनंतकुमार जुमडे,सरकार इंगोले, सुभाष अंभोरे,प्रवीण पट्टेबहादुर आणि सर्व कुटुंब आणि समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन मुंबई येथून विशेष उपस्थित असलेले राजकुमार पडघान यांनी केले.
*********************************

