स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रमुख पदी धुळ्यातून शुभांगी पाटील*
1 min read

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रमुख पदी धुळ्यातून शुभांगी पाटील*

Loading

*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रमुख पदी धुळ्यातून शुभांगी पाटील*

धुळे : (खान्देश मैदान वृत्त) । आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षातर्फे नेते उपनेत्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये धुळ्यातून शिवसेना उपनेते शुभांगी पाटील यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.पक्षाच्या वरिष्ठस्तरावर या निवडणुकांबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते खासदार संजय राऊत ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुभाष देसाई व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची निवडणुकांसंदर्भात सर्व नेते, राज्य उपनेते व जिल्हाप्रमुख यांची बैठक शिवसेना भवन मुंबई येथे घेण्यात आली होती .बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत धुळे जिल्ह्यातून जिल्ह्याचे प्रमुख म्हणून शिवसेनेच्या राज्य उपनेते शुभांगी पाटील तसेच शिवसेना उपनेते तथा धुळे जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार अशोक धात्रक व नाशिक जिल्ह्याचे शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना धुळे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे नेते व उत्तर महाराष्ट्रचे प्रमुख खासदार संजय राऊत, पक्षाचे नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली सदर त्रिसदस्यीय टीम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *