खासदार स्मिताताई वाघ यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान स्टॉल ला भेट, नागरिकांना आवाहन
![]()
खासदार स्मिताताई वाघ यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान स्टॉल ला भेट, नागरिकांना आवाहन
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अमळनेर
येथील इंदिरा भवन येथे दिनांक 23 मे 2025 रोजी सर्व शासकीय योजना माहिती*
All Government Schemes.
प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांची उपस्थिती होती.आधार संस्था,जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पाचा प्रदर्शन स्टॉल लावला होता. त्या प्रदर्शन स्टॉल ला खासदार स्मिताताई वाघ यांनी भेट दिली त्यांना बालविवाह मुक्त भारत अभियान याविषयी माहिती देण्यात आली. नागरिकांना बालविवाह मुक्त भारत करण्याचे आवाहन केले .
SDM प्रांत अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद CO,कृषी विभाग अधिकारी, पंचायत समिती,आरोग्य विभाग,पोलिस प्रशासन,महिला बचत गट सर्व शासकीय कर्मचारी उपस्थित राहून योजने विषयी मार्गदर्शन करत आहेत .
आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर जिल्हा जळगाव जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन
टीम मेंबर्स , अध्यक्ष डॉ भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद,
आनंद पगारे, मोहिनी धनगर, सोनल भोई, स्मिता कोकणी, अनिता पावरा, वंदना पावरा


