प्रा.भगवान जगदाळे यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…”  National Excellent Teacher Award-2
1 min read

प्रा.भगवान जगदाळे यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…” National Excellent Teacher Award-2

Loading

प्रा.भगवान जगदाळे यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…”

National Excellent Teacher Award-2025

माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या २४ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे, विद्यार्थीप्रिय, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्रा.भगवान बापूजी जगदाळे यांना नुकताच रिअल इंडो ग्लोबल सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फॉउंडेशन, धुळे यांच्यातर्फे “नॅशनल एक्सलंट टीचर अवॉर्ड” अर्थात “राष्ट्रीय उत्कृट शिक्षक” हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवारी (ता.१८) एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनचे राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मनोहर पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, रिअल इंडो-ग्लोबलचे अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी पाटील, उपाध्यक्ष डॉ.मोहन पावरा, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील, प्रफुल्लकुमार सिसोदे, डॉ.दिलीप पाटील, माजी प्राचार्य डॉ.पी.डी.देवरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.जगदीश पाटील, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.एस.एस. राजपूत, शिक्षणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.एस.टी.भुकन, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, प्राचार्य.डॉ.एस.एम.वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे साहित्य वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “नॅशनल एक्सलंट टिचर अवॉर्ड” अर्थात “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक” हा मानाचा पुरस्कार प्रा.भगवान जगदाळे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातही प्रा.जगदाळे यांचे भरीव योगदान आहे. ते मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत. यापूर्वी त्यांना ओबीसी असोसिएशन, धुळे यांच्यातर्फे गुरुगौरव पुरस्कार, लोकहित पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पत्रकारितेतील बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, तर डॉ.गायकवाड फाउंडेशन, वाशिम यांच्यातर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी या पुरस्काराचे श्रेय आपल्या शाळेला व कुटुंबियांना दिले आहे. त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *