माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा….* *आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य..*
1 min read

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा….* *आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य..*

Loading

*माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा….*
*आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य..*

जळगाव:- शालार्थ आय् डी च्या चौकशांमुळे पगारासाठी अनुदान उपलब्ध असूनही जिल्ह्यातील १५००० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा एप्रिल महिन्याचा पगार प्रलंबित होता. जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने वेतन पथकाचे अधिक्षक रियाज तडवी साहेबांना वेतन बिल कोषागारात न पाठविल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन वेतन देयक कोषागार कार्यालयात पाठविण्यात आले.परंतु वेतन पथकाने मार्च महिन्यात कोषागारात पाठविलेले एक देयक अकाउंट नंबर मिस मॅच असल्याने प्रलंबित होते. व त्यामुळे बिम्स प्रणाली नवीन वेतन बिल स्विकारत नव्हते. कोषागार अधिकारी मा.खैरनार साहेब यांनी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नव्हता. शेवटी आमदार सत्यजित तांबे यांना संपर्क साधून जिल्ह्यातील पगाराच्या समस्येत लक्ष घालण्याची विनंती केली. आमदार सत्यजित तांबे यांनी विभागीय कोषागार अधिकारी व शिक्षण संचालनालय पुणे यांच्याशी पाठपुरावा करून प्रलंबित असलेले देयक मंजूर करण्यासाठी असलेली अडचण दूर झाल्याने एप्रिल महिन्याचा पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर पगार होण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने एस्.डी.भिरुड, प्रा.सुनील गरुड,जे.के.पाटील , नंदन वळींकर, शैलेश राणे यांनी पाठपुरावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *