जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
1 min read

जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Loading

जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. 15 मे 2025 रोजी शालेय समितीचे चेअरमन श्री. बापूराव भिला महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती मा. अनिल दादा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. उत्राण अहीर हद्दचे माजी सरपंच श्री. गुरुदासभाऊ चौधरी, उद्योजक श्री. मनोजभाऊ महाजन व प्रगतिशील शेतकरी श्री. गोपालभाऊ महाजन इत्यादी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये विद्यालयाने चांगले यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल 95.44% इतका लागला आहे. सपना राजेंद्र गुरव या विद्यार्थिनीने विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून 83.20% गुण प्राप्त केले आहेत. द्वितीय क्रमांक चैताली कैलास कासार 74 टक्के, तृतीय क्रमांक हर्षदा पंकज सोनवणे 72.80 टक्के, चतुर्थ क्रमांक राधिका विजय आदीवाल 71 टक्के, आणि पाचवा क्रमांक पद्माकर आबा पाटील 69.80% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या उज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांना मेडल देऊन मान्यवरांमार्फत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकांसमवेत करण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण येथे अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा व्यवस्थापनामार्फत प्रयत्न सुरू असून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याचा संकल्प शाळेने केला असल्याचे आपल्या प्रास्ताविकमध्ये विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक भरत शिरसाठ यांनी सांगितले. ‘माझ्या यशामध्ये माझ्या आई-वडिलांसह माझ्या शाळेतील शिक्षकांचा मोठा वाटा आहे’ असे मत प्रथम क्रमांक प्राप्त केलेली विद्यार्थिनी सपना गुरव ने आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक पी.ए.महाजन सर यांनी केले तर आभार लिपिक दीपक महाजन यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एस.बी. चव्हाण सर, एम. एम. पाटील सर, पी.ए. महाजन सर, आर.आर.पाटील सर, सौ.ए.जी.वाघमारे मॅडम, एस.एन.निकुंभ सर, सौ.एस.ए.साळुंखे मॅडम, लिपीक दिपक महाजन, शिक्षकेतर कर्मचारी शैलेश त्रिपाठी व ग्रंथपाल कैलास वाघ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *