निशांत विजय पाटील आणि क्रीष्णा भामरे यांचे प्रताप विद्या मंदीर, चोपड्यात भव्य यश
1 min read

निशांत विजय पाटील आणि क्रीष्णा भामरे यांचे प्रताप विद्या मंदीर, चोपड्यात भव्य यश

Loading

निशांत विजय पाटील आणि क्रीष्णा भामरे यांचे प्रताप विद्या मंदीर, चोपड्यात भव्य यश

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – प्रताप विद्या मंदीर, चोपडाच्या इ. १० वी वर्गातील निकालात निशांत विजय पाटील यांनी ९५% गुणांसह उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. निशांत हे विजय शालीकराव पाटील बुधगावकर आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, चोपडा यांचे चिरंजीव पुत्र असून त्यांनी कष्टपूर्वक केलेल्या मेहनतीचे फळ घेतले आहे.
त्याची मावस बहीण क्रीष्णा दिपक भामरे यांनीही ९०% गुण मिळवून उज्ज्वल यश संपादित केले आहे. क्रीष्णा ही श्री दिपक मधुकर भामरे, ग्रामसेवक, चोपडा यांची कन्या असून त्यांनीही दहावीच्या परीक्षेत आपल्या मेहनतीची छाप सोडली आहे.
दोघेही विद्यार्थी श्री भास्करराव नानाजी पाटील, मा. अधीक्षक, जि.प. जळगाव आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मराठा सेवा संघ (सावि) यांचे नातू असून, त्यांना श्री पंकज प्रतापराव शिंदे, शिक्षक प्रताप विद्या मंदीर, चोपडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल नातेवाइकांसह शिक्षक वर्ग आणि शाळा व्यवस्थापनाकडून विशेष अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *