राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा “जिल्हाध्यक्ष” पदी सनी गायकवाड यांची निवड..!
1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा “जिल्हाध्यक्ष” पदी सनी गायकवाड यांची निवड..!

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा “जिल्हाध्यक्ष” पदी सनी गायकवाड यांची निवड..!

अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी सनी गायकवाड यांची मंगळवारी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली,
सनी गायकवाड हे या आधी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी काम करत होते या दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमानात विद्यार्थी वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जोडले आहे,
माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सोशल मीडिया या प्रमुख सेलच्या जिल्हा स्तरावर काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे,
मंगळवारी मुंबई येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण,आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विधानपरिषद आमदार व प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष आनंद पवार यांच्या उपस्थितीत सनी गायकवाड यांची निवड करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *