माध्यमिक विद्यालय रणाईचा भव्य निकाल: 10 वी मध्ये 93.10% सरासरी, नंदिनी बंजारा ठरली प्रथम!**
![]()
**माध्यमिक विद्यालय रणाईचा भव्य निकाल: 10 वी मध्ये 93.10% सरासरी, नंदिनी बंजारा ठरली प्रथम!**
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– माध्यमिक विद्यालय रणाईच्या इयत्ता १०वीच्या निकालात विद्यार्थ्यांनी कमाल कामगिरी करीत एकूण ९३.१०% गुणांच्या सरासरीने शालेय इतिहासात नवीन उच्चांक स्थापन केला आहे. या निकालाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोबल वाढले आहे.
या निकालात नंदिनी प्रदीप बंजारा ९२.६०% गुणांसह प्रथम, मीनाक्षी नामदेव ८७.४०% गुणांसह द्वितीय, तर दिशा रविंद्र ८४.००% गुणांसह तृतीय स्थान पटकावले आहे.
संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यर्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्यशील असलेल्या माध्यमिक विद्यालय रणाईने पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली आहे.

