**“सेवानिवृत्त सार्जंट उतेकर आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांचा शौर्यगाथांनी भारलेला मनमोहक सन्मान सोहळा”**
1 min read

**“सेवानिवृत्त सार्जंट उतेकर आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांचा शौर्यगाथांनी भारलेला मनमोहक सन्मान सोहळा”**

Loading

जवान कृतज्ञता दिन संपन्न

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

१० मे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील वीरजवानांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी
जवान कृतज्ञता दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सेवा संघ,पारले आयोजित प्रणाम वीरा या कार्यक्रमात उपस्थित ऑपरेशन पवन मध्ये विशेष योगदान असलेले सेवानिवृत्त सार्जंट (ॲड.)दत्तात्रय अर्जुन उतेकर भारतीय हवाई दल तसेच वीरमाता अनुराधाताई गोरे यांचा कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांनी यथोचित सन्मान केला.
संघ कार्यवाह डाॅ. रश्मी फडणवीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दिशा कर्णबधिर विद्यालयाच्या कार्यवाह सुरक्षा घोसाळकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा परिचय करून देण्याची जबाबदारी
उत्कृष्टपणे पार पाडली.
सेवानिवृत्त सार्जंट (ॲड.)दत्तात्रय अर्जुन उतेकर यांनी परमवीर चक्र विजेत्या वीरांच्या शौर्यगाथा कथन केल्या.
भारतमातेच्या सुपुत्रांच्या स्फूर्तिदायक अनुभव कथनाने सभागृहातील वातावरण भारावून गेले.
वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी नागरिकांच्या जबाबदारी संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिभा सराफ आणि दिलासा सदस्यांनी विविध समरगीते सादर केली.. देशवासियांच्या सुरक्षितते साठी त्याग आणि समर्पण करणा-या शूरवीरांबद्दल साश्रूनयनांनी कृतज्ञता व्यक्त करीत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *