अमळनेरतील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सवात राजे संभाजी मित्र परिवाराचा ३० वर्षांचा थंड पुदिना शरबत वाटपाचा गौरवपूर्ण परंपरा जोपासली”
![]()
“अमळनेरतील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सवात राजे संभाजी मित्र परिवाराचा ३० वर्षांचा थंड पुदिना शरबत वाटपाचा गौरवपूर्ण परंपरा जोपासली”
अमळनेर प्रतिनिधी
सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सवाच्या शुभ प्रसंगी, अमळनेरमध्ये राजे संभाजी मित्र परिवाराकडून परंपरेनुसार थंड पुदिना शरबत वाटप करण्यात आले. हे वार्षिक कार्यक्रम सुमारे २५ ते ३० वर्षांपासून सलाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक (दगडी दरवाजा) येथे आयोजित केला जातो आणि दरवर्षी वेगळ्या प्रकारचे पेय वाटप करण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे.
यावेळी, हॉटेल इंद्रभुवनचे संचालक मनीषभाऊ जोशी व त्यांच्या सहपत्नी यांनी शुभारंभ करत फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात केली. विठूमाऊलींची प्रतिमा पूजन देखील करण्यात आली. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात राजे संभाजी मित्र परिवार आणि शिवशक्ती मित्र परिवाराचे सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पालखी मोहत्सवाचा भाग म्हणून या थंड पुदिना शरबत वाटपाच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मता आणि परंपरेचे जतन करण्याचा संदेश दिला जातो. यामुळे स्थानिक दरबारी व स्थानिक लोकांमध्ये उत्साह आणि श्रद्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे.


