ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळ आयोजित व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा १४ मे ला होणार सत्कार समारंभ
1 min read

ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळ आयोजित व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा १४ मे ला होणार सत्कार समारंभ

Loading

ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळ आयोजित व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा १४ मे ला होणार सत्कार समारंभ

अमळनेर प्रतिनिधी– ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थ मंडळींच्या संयुक्त आयोजनाखाली गावात एक महत्वाचा सामाजिक कार्यक्रम होणार आहे. आगामी बुधवार, दि. १४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत “ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना” या विषयावर एक उपयुक्त व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष – मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. डॉ. जोशी यांचे व्याख्यान ग्रामीण भागातील विकास आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण दिशा साकल्याने भरलेले आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
कार्यक्रमाबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने लोंढेवे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माननीय उपसभापती बाळासाहेब जीवन पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक शालीग्राम पाटील,सेवानिवृत्त आदर्श केंद्रप्रमुख बन्सिलाल भागवत गुरुजी यांनी माहिती देत सांगितले की, या व्याख्यानाचा उद्देश ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रेरणा जागवणे, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करणे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन देणे हा आहे.

गावातील शिक्षण व विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून, ग्रामपंचायत लोंढवे ह्या उपक्रमामुळे गावातील युवा पिढी नव्या संकल्पना आत्मसात करून देश-प्रदेशाच्या विकासात आपला वाटा उचलण्यास प्रोत्साहित होणार आहे.
सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन लोंढवे ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *