महाराष्ट्रातील 100 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रो,आयआयटी अभ्यास सहलीची संधी. , नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत 100 विद्यार्थी जाणार इस्रोला. दिव्यांग तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष जागा.20 मे पर्यंत अर्जची मुदत.
![]()
महाराष्ट्रातील 100 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रो,आयआयटी अभ्यास सहलीची संधी.
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत 100 विद्यार्थी जाणार इस्रोला. दिव्यांग तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष जागा.20 मे पर्यंत अर्जची मुदत.
जळगांव प्रतिनिधी
– मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत अशातच विद्यार्थी व पालकांसाठी सुखद बातमी आहे. 100 हुन अधिक विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभ्यास सहलीला जाण्याची संधी जळगावच्या नोबेल फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत दिव्यांग प्रज्ञाचषु तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विशेष राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.या प्रकल्पासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे.
विज्ञान व संशोधन क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नोबेल फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्रो), आयआयटी, आयआयएम यासारख्या उच्च शिक्षण संस्था अनुभवता याव्यात तसेच विज्ञान व गणित या विषयाचा पाया पक्का व्हावा यासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे “नोबेल सायन्स टॅलेंट सर्च” परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते . आतापर्यंत 750 हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत इस्रो,आयआयटी, येथे भेट दिलेली आहे इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व बोर्डच्या 5वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा 8 जून 2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.अर्ज करण्यासाठी nsts.nobelfoundation.co.in या संकेतस्थळावर नोंदणी कारायची आहे.अर्ज करण्याला अंतिम 20 मे 2025 पर्यंत मुदत आहे. मागील वर्षी या परीक्षेद्वारे 125 विद्यार्थ्यांची इस्रो,आयआयटी सहलीसाठी निवड झालेली आहे.
या परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये येणाऱ्या प्रथम 100 विद्यार्थ्यांना निशुल्क इस्रो, आयआयटी आयआयएम, सायन्स सिटी, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अभ्यास सहलीला नेण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी निवडण्यात येईल .या विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात उन्हाळी व हिवाळी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच अवकाश विषयक पुस्तके भेट दिली जाणार आहेत.
या उपक्रमाबाबत बोलताना नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील म्हणाले की ” महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहेत या विद्यार्थ्यांना शालेय वयापासून जर संशोधनाची गोडी लागली तर महाराष्ट्रातून नोबेल विजेते शास्त्रज्ञ घडतील यासाठी सामूहिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करीत आहोत जेणेकरून गोरगरिबांच्या मजुरांच्या मुलांनासुद्धा इस्रो सारख्या जागतिक दर्जाच्या संस्था अभ्यासायला मिळतील”
तरी अधिकाधिक शाळा व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी नोबेल फाउंडेशन जळगाव 7218501444,9764440430
या क्रमांकावर संपर्क साधावा.


Hii