मातृदिन विशेष: संघर्षातून उमटलेली ममता”
1 min read

मातृदिन विशेष: संघर्षातून उमटलेली ममता”

Loading

“मातृदिन विशेष: संघर्षातून उमटलेली ममता”

 

माय माय असते
लंगड्या चा पाय
वासराची गाय
दुधावरची साय असते
आज मातृदिन विचार करा तुमचा भाऊ किंवा बहीण अंध अपंग मुक आहे जर साधी कल्पनाही करवत नाही तर अशा मुलांना वाढवणं त्यांच पालनपोषण करण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण किती कठिण असेल.ते मुलं कस जतन केलं जातं असेल ज्याला समाज अपशकून पापी दुवाळ कमनशिबी व्यंगी अपंग आणि आता सो कॉल्ड दिव्यांग ठरवलं जातं असेल त्याला पोकळ दया मया माय बाप सोडून सगळे लावत असतील त्यांची मानसिकता कमकुवत केली जात असेल पदोपदी त्यांना टोमणे टिका या गोष्टी त्या माय माऊली समोर मारले जात असतील तर ती आई कशी सहन करत असेल…….. आपण तर बोलून मोकळे होतो पण त्या माय माऊली च काळीज रक्ताळत…….. समाजात या मुलांना जीवनभर साथ व कायम स्वरुपी हातेचा आधार लाभत नाही.मग भारतीय संस्कृती च्या दया मया दुःख वेदना स्वीकारून जगणाऱ्या गांधारीच्या गप्पा कागदी ठरतात वास्तविक कोणी ही त्यांना साथ देत नाही…
अशा मुलांना जन्म देवून वाढविणाऱ्या पालनपोषण करणाऱ्या जगातील सर्व आईंना मातांना माय माडींना मातृदिन च्या हार्दीक शुभेच्छा
एक दिव्यांग…..
प्रकाश पाटील
संचालक- यशपंढरी इंग्रजी क्लास अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *