अमळनेर येथे दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन* १० व ११ मे उच्च पदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार
![]()
*अमळनेर येथे दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन*
१० व ११ मे उच्च पदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दहावी बारावी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर १० व ११ मे रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत युपीएससी, एमपीएससी, एनडीए, नीट,जेईई व विविध स्पर्धा परीक्षांविषयी उच्च पदस्थ अधिकारी व तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा सकाळी ठीक साडे आठ ते साडे बारा यावेळेत राहील. दिनांक १० मे रोजी आयआरएस विशाल मकवाने अतिरिक्त आयकर आयुक्त नाशिक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल अध्यक्षस्थानी मंगळ ग्रह सेवा संस्थानचे अध्यक्ष डीगंबर महाले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नोबेल फाऊंडेशन जळगांवचे संस्थापक जयदीप पाटील, निवृत्त डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ.अतुल सूर्यवंशी व पोस्टल असिस्टंट संदीप पाटील यांचे मार्गदर्शन होईल.
दिनांक ११ मे रोजी याच वर्षी युपीएससी उत्तीर्ण झालेले योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त कपिल पवार, अमळनेर उपविभागाचे डीवायएसपी विनायक कोते, एरंडोलचे तहसिलदार प्रदीप पाटील, अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले तसेच २०२३ च्या एमपीएससीत उत्तीर्ण जयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ एस आर चौधरी राहतील.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शना सोबत विविध स्पर्धांचे व बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेत नाव नोंदणी साठी ८००७५३५०९३/७०२०४३२८१६ या क्रमंकावर संपर्क साधावा.ठिकाण पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय (टाऊन हॉल) अमळनेर.

