रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली*  *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .*
1 min read

रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली* *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .*

Loading

*रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली*

*डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .*

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) : लक्ष्मी गुप्ता या महिलेसाठी सोमवारचा दिवस एका कठीण प्रसंगाचा साक्षीदार ठरला, मात्र मानपाडा पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे तो प्रसंग सुखद आठवणीत बदलला. आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना लक्ष्मी गुप्ता यांनी 2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरली होती.

बॅग हरवलेचं लक्षात येताच त्यांनी तातडीने मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ आणि PSI गणेश भाबड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक सक्रिय करण्यात आले.

तपासासाठी पो.हवा. विकास माळी, HC सुनील पवार, HC संजू मासाड, HC शिरीष पाटील, PC अशोक आहेर, PC विजय आव्हाड आणि PC सोपान शेडके यांनी तत्परतेने काम करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माध्यमातून रिक्षाचा शोध घेऊन संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेतला गेला.

प्रामाणिकपणे सहकार्य करत रिक्षाचालकाने बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली. अखेरीस लक्ष्मी गुप्ता यांना त्यांची मौल्यवान दागिन्यांची बॅग सुरक्षितरीत्या परत मिळाली. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यतत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *