“शिंदखेडा अपघातात देवदूत बनले पोलीस पाटील व मित्रपरिवार, दोन युवकांचे प्राण वाचवले”
1 min read

“शिंदखेडा अपघातात देवदूत बनले पोलीस पाटील व मित्रपरिवार, दोन युवकांचे प्राण वाचवले”

Loading

भडणे येथील अपघातातील मदतीला धावून जखमी युवकांचे वाचवले प्राण,,,,,,,,,,,,,,,,
भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी ठरले जखमी युवकांसाठी देवदूत,,,,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील दोन युवक दिनांक तीन मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिंदखेडा येथून घरी भडणे येत असताना शिंदखेडा रेल्वे स्टेशन नजीक दुचाकी वाहन घसरल्यामुळे सचिन भील राहुल मंगळे या दोघं तरुणांना डोक्याला तसेच छातीला जबरदस्त मार लागल्याने जखमी अवस्थेत रस्त्यावरच भर उन्हात पडले होते येणारे जाणारे फक्त बघ्याची भूमिका घेऊन फोटो काढत होते काही वाहन चालकांनी आस्थेवाईकपने पणे उभे राहून चालकांनी दोघांची चौकशी केली असता हे दोघ युवक भडणे येथिल असल्याचे समजल्यावर त्यांनी भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांना दूरध्वनी कळविले पाटील यांनी क्षणाचा विलब न करता घटनास्थळी राजेंद्र पाटील मनोहर पाटील प्रशांत पाटील भास्कर पाटील यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेत व अपघाताविषयी घटनेची माहिती शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पी आय बाळासाहेब थोरात यांना देण्यात आली जखमींना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स ला वेळ लागणार होता म्हणून रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना पोलीस पाटील व त्यांच्यासोबत असलेला राजेंद्र पाटील यांनी विनंती करूनजखमींना लगेच खाजगी वाहनाने शिंदखेडा येथील सिविल हॉस्पिटल येथे आणले तेथे प्राथमिक उपचार करून दोघांची प्रकृती जास्त चिंताजनक असल्याने व रक्तस्राय थांबत नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना दोघांना धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरकारी ॲम्बुलन्स पाठवले वेळीच धुळे येथील सरकारी दवाखान्यात डॉक्टरांचा उपचार मिळाल्याने दोन युवकांचे प्राण वाचल्यामुळे पोलीस पाटील युवराज माळी व त्यांचे मित्र अपघाता समयी देवदूतासारखे धावून आल्याने या दोघ युवकाना दवाखान्यात वेळीच उपचार झाल्याने त्यांना जीवदान मिळाल्याने व त्यांचा जीव वाचला यामुळे पोलीस पाटील व त्यांचा मित्रपरिवार या युवकांसाठी देवदूत ठरले एवढं मात्र निश्चित
चौकट,,,,,,
दुपारची वेळ उन्हाची तीव्रता येणारा जाणाऱ्यांची वर्धळ मात्र अपघाता समयी कोणीही मदतीसाठी धावून येत नव्हते बघ्यांची मोठी गर्दी दोघं युवक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते भडणे पोलीस पाटील व त्यांचे गावकरी जखमी युवकांना घेऊन दवाखान्यात दाखल झाले यामुळे लवकर उपचार मिळाले,,,,,,,,,,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *