अमळनेर तालुक्यात 12 वी च्या परीक्षेत मनुश्री बाविस्कर प्रथम
![]()
अमळनेर तालुक्यात 12 वी च्या परीक्षेत मनुश्री बाविस्कर प्रथम
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्री एन टी मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी मनुश्री सूर्यकांत बाविस्कर हिने 12 वीच्या परीक्षेत 89.65% गुण मिळवून अमळनेर तालुक्यात विज्ञान शाखेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे कमांडंट लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांनी पेढे भरवून यशाचा आनंद साजरा केला. यावेळी राज्य सैनिकी शाळा असोसिएशन चे सदस्य उमेश काटे, तालुका गणित मंडळाचे गोपाल हडपे, फापोरे विद्यालयाचे शिक्षक महेश बोरसे आदि उपस्थित होते. मनुश्री ही विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे जेष्ठ विज्ञान शिक्षक एस ए बाविस्कर व मुडी प्रगणे डांगरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षिका स्वाती कदम – बाविस्कर यांची कन्या आहे. तीच्या यशाबद्दल मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, युवा उद्योजक अमेय मुंदडा, प्राचार्य नरेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
—-
अमळनेर – तालुक्यातून विज्ञान शाखेत प्रथम आलेली मनुश्री बाविस्कर हिचा सत्कार करताना लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे. शेजारी एस ए बाविस्कर, स्वाती कदम-बाविस्कर, गोपाल हडपे, उमेश काटे

