महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे – मा. उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे निर्देश
![]()
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे – मा. उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे निर्देश
पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – “सामाजिक न्यायासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे,” असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले.
महात्मा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम सुरू असून,याबाबतच्या आयोजित बैठकीत त्या म्हणाल्या की, “हे स्मारक उशिरा होत असले तरी पण गुणवत्तापूर्ण होत आहे.मात्र काम पूर्णत्वास नेण्यासाठी आता अधिक गती आवश्यक आहे.”
त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नमूद केले की, “पुणे हे सामाजिक चळवळींचे केंद्र राहिले आहे. अशा ठिकाणी फुले दांपत्यांचे स्मारक केवळ पुणेकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरेल.”
डॉ. गो-हे यांनी स्मारक परिसराचे नियोजन, उभारणीसाठी लागणाऱ्या निधीच्या वापराची माहिती ,समितीची रचना व कार्यपद्धती आणि त्याच्या सध्याच्या प्रगतीची चौकशी केली. स्मारकाचे परिसरातील मालक,भाडेकरू कुटुंबांना मोबदला,त्यांचे पुनर्वसन,जमिन अधिग्रहण,स्मारकांची डागडुजी,आवश्यक सोयीसुविधा,स्मारकाचे ठिकाणी सुरक्षा व्यवस्था या विषयात संबंधित विभागांनी आपली जबाबदारी वेळेत पार पाडावी यावर त्यांनी भर दिला.त्यांनी सुचवले की, “यामध्ये कोणतीही दिरंगाई न होता तातडीने कामे पूर्ण केली जावीत व महात्मा फुले जयंती पुर्वी सर्व कामकाज पुर्ण करावे.”
या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष निलेश श्री गिरमे,अधीक्षक अभियंता श्री गव्हाणे,उपायुक्त श्री दांगट,शिक्षणाधिकारी श्री कारेकर व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

