विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत करणार!  सहाय्यक आयुक्त कपिल पवार : शिरुड येथील अभ्यासिकेला भेट
1 min read

विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत करणार! सहाय्यक आयुक्त कपिल पवार : शिरुड येथील अभ्यासिकेला भेट

Loading

विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत करणार!

सहाय्यक आयुक्त कपिल पवार : शिरुड येथील अभ्यासिकेला भेट

अमळनेर – दातृत्वातून साकारलेली अभ्यासिका खरोखरच कौतुकास्पद आहे. या अभ्यासिकेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मत आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार (नाशिक) यांनी व्यक्त केले. शिरूड (ता. अमळनेर) येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
शिरूड येथे पुण्याच्या धर्तीवर बनवलेली सुसज्ज अशी वायफायुक्त अभ्यासिका लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेली आहे. या अभ्यासिकेत गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. त्या विद्यार्थ्यांना स्फूर्ती येण्यासाठी व मार्गदर्शन मिळण्यासाठी नुकतीच आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार साहेब यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही रिक्त पदांची जाहिरात कशी येते, त्याचे फॉर्म कसे भरतात, त्याची तयारी कशी करतात, मैदानी चाचणीसाठी तयारी कशी करावी, याची सखोल माहिती दिली व मार्गदर्शन केले. त्यासोबत प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे अद्यावत ठेवणे अपेक्षित असते. जर ते कागदपत्रे अद्यावत नसतील तर ते अध्यायावत करून घ्यावेत असे आवाहन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी स्फूर्तीदायी वातावरण निर्माण झाले.यावेळी तालुक्यातील नावाजलेली फ्रुट सेल सोसायटीच्या नूतन संचालक पदी उमेश काटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांसाठी त्यांची ही निवड मार्गदर्शक ठरेल असा विश्वास देखील निर्माण केला. यावेळी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी, समन्वयक डी. ए. धनगर, माजी उपसरपंच वसंतराव भगवान पाटील, अतुल अशोक पाटील, विनोद विश्वास पाटील हजर होते.

*स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट!*

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले भारताचा भगीरथ भूगोल व महाराष्ट्राचा भगीरथ भूगोल या पुस्तकाचे लेखक तथा सहाय्यक आयुक्त कपिल पवार यांनी शिरुड येथील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची उपयुक्त अशी पुस्तके अभ्यासिकेला भेट स्वरूपात दिलीत. भविष्यात अधिकारी होण्यासाठी ही पुस्तके निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. दरम्यान उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळाचा मार्गदर्शनाचा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असून अनेक होतकरू तरुणांना त्याचा लाभ होताना दिसत आहे.
—–
शिरुड (ता अमळनेर) – आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार यांचा सत्कार करताना वसंतराव पाटील, डी ए धनगर आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *