महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा  जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम
1 min read

महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम

Loading

महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा

जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी
देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त अत्यंत उत्साहात आणि आदरांजलीने ध्वजारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जेष्ठ शिक्षक बापूसाहेब अरविंद सोनटक्के सेवानिवृत्तीच्या शेवटपर्यंत शाळेत नियमित हजर होते व त्यांच्या शाळेच्या सर्व उपक्रमांमध्ये सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करून गौरव करण्यात आला. या निमित्ताने शिक्षक आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजीराव पाटील आणि गुरूदास पाटील उपस्थित होते.

 

 

 

राज्याच्या गौरवशाली महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमाने शाळेमधील राष्ट्रभक्तीची जाणीव जागृत केली असून एकात्मता आणि अभिमान अधिक दृढ केला आहे. या उत्सवाने विद्यार्थी व शिक्षक यांना देशभक्ति आणि सामाजिक समर्पणाच्या मूल्यांची शिकवण दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *