खाऱ्यापाडावच्या जि.प.शाळेला ‘माझी शाळा सुंदर शाळा’ मोहिमेत  चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा सन्मान!
1 min read

खाऱ्यापाडावच्या जि.प.शाळेला ‘माझी शाळा सुंदर शाळा’ मोहिमेत चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा सन्मान!

Loading

खाऱ्यापाडावच्या जि.प.शाळेला ‘माझी शाळा सुंदर शाळा’ मोहिमेत चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा सन्मान!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या जिल्हा शिक्षण संस्थेमार्फत आयोजित ‘मा.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत आदिवासी बहुल भागातील खाऱ्यापाडाव जि.प.शाळा तालुक्यात द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आली आहे.
या गौरवशाली कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विजय कचवे यांना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी अनिल विसावे, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील, पंकज विद्यालयाचे पंकज बोरोले, सरपंच दत्तरसिंग पावरा, सदस्य गोविंद बारेला, जयसिंग पावरा, शाळा समितीचे राजू पावरा, वृक्षमित्र आर.आर. सोनवणे, सुकलाल बारेला, रवींद्र पाटील आणि विकास पाटील यांचा इच्छा व्यक्त केली.
शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता व संवर्धनाकडे केलेल्या विशेष लक्षामुळे मिळालेल्या या यशासाठी शाळा व्यवस्थापनाची आणि शिक्षक कर्मचार्‍यांची सर्वत्र दखल घेतली जात आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांना व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळाला हा गौरव अनमोल ठरला आहे.
खाऱ्यापाडावाच्या जि.प.शाळेला मिळालेल्या या यशाबद्दल स्थानिक परिसरात व शैक्षणिक मंडळात सर्वत्र आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *