वसूंधरा दिनाच्या जाहिराती फक्त बिड जिल्ह्याला….!आपली छबी चमकवून‌ फक्त बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणाऱ्या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…!  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
1 min read

वसूंधरा दिनाच्या जाहिराती फक्त बिड जिल्ह्याला….!आपली छबी चमकवून‌ फक्त बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणाऱ्या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Loading

वसूंधरा दिनाच्या जाहिराती फक्त बिड जिल्ह्याला….!आपली छबी चमकवून‌ फक्त बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणाऱ्या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अकोला प्रतिनिधी

.मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळात संबंध राज्याला समान न्याय देऊन सर्वसमावेशक कल्याण आणि विकासाची भुमिका घेणारे मंत्री आहेत की केवळ आपल्या मतदारसंघापुरते याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे.कालच्या वसुंधरा दिनाच्या ८०० से.मी.च्या जाहिराती फक्त बिड जिह्यातील वृत्तपत्रांना देण्यात आल्यात.शेवटी बिडमधील पत्रकार आणि वृत्तपत्रे ही आमची आणि महाराष्ट्राची भावंडेच आहेत.त्यांच्याबध्दल दुमत नाही.परंतू हा पक्षपाताचा कलह निर्माण केला आणि महाराष्ट्रातील ईतर वृत्तपत्रांना सापत्न‌ वागणूक देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला.फक्त स्वत:चा फोटो चमकवून आपली जाहिरात करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शासकीय निधीचा दुरूपयोग केल्याची माहिती पुढे आलेली आहे..स्वत:चे राजकारण सांभाळण्यासाठी जर पंकजा मुंडे यांनी राज्यातील ईतर वृत्तपत्रांवर अन्याय करून अशी भुमिका घेतली असेल तर त्यांनी शासकीय निधी न वापरता स्वत:जवळून हा खर्च करून आपली ही हौस भागवायला पाहिजे होती.असा प्रश्न अन्यायग्रस्त संतप्त पत्रकारांच्या वतीने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी उपस्थित केला‌ आहे.

वसुंधरादिनासह संबंध दिन हे महाराष्ट्र आणि देशभरात साजरे केले जातात. मग प्रत्येकी वेळी ईतर मंत्र्यांनीही केवळ आपला मतदार संघ आणि जिल्ह्यांपुरत्या तेवढ्याच वृत्तपत्रांना जाहिराती देणे योग्य ठरेल का? यामुळे शासनाच्या नि:पक्षपातीपणाच्या प्रतिमेला धक्का लावणारे पंकजा मुंडेसारख्या अशा संकुचित वृत्तीच्या अतिउत्साही मतलबी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावे.तशाच ८०० से.मी.च्या जाहिराती महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांना द्याव्यात.अन्यथा या जाहिरातींचा त्यांनी मनमानी वृत्तींने केलेला खर्च पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचेकडून वसूल करावा अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी मा.ना. देवेन्द्रजी फडणवीस,मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे.

====================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *