माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची अमळनेर आर्मी स्कूलला सदिच्छा भेट
1 min read

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची अमळनेर आर्मी स्कूलला सदिच्छा भेट

Loading

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची अमळनेर आर्मी स्कूलला सदिच्छा भेट

अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी सैनिकी शाळेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज जाणून घेतले.शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या. यावेळी खान्देश विभागाचे जिल्हा सैनिकी अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील,संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्राचार्य विजय बोरसे, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, जेष्ठ शिक्षक बी. डी. पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, सुभेदार ए के पाटील, प्रेमराज सूर्यवंशी यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे शालेय प्रशासनातर्फे शाल श्रीफळ व बुके देऊन स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.
—–
अमळनेर- माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचा सत्कार करताना प्राजक्ता शिंदे शेजारी संस्थेचे प्रा सुनील गरुड, विजयसिंह थोपटे, विजय बोरसे, नागराज पाटील आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *